#

Advertisement

Tuesday, November 17, 2026, November 17, 2026 WIB
Last Updated 2026-11-17T11:49:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक !

Advertisement

‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

पुणे : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदांवर टीका करत, केवळ एका फोटोवरून विमान अपघाताशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी रोहित पवार अशा पत्रकार परिषदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ‘मफलरवाला नेता’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “एका कार्यक्रमात जाण्याचा आणि अजित पवारांच्या अपघाताचा काय संबंध? एका फोटोवरून अपघाताचे कनेक्शन जोडणे चुकीचे आहे.” रोहित पवार प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेत असल्याची टीकाही बन यांनी केली. “आजपर्यंत त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या; मात्र एकही ठोस पुरावा दिलेला नाही,” असा दावाही त्यांनी केला. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, हे पथक तपास करेल, असे नवनाथ बन यांनी सांगितले. दुसरीकडे, रोहित पवार यांनी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली आहे.