#

Advertisement

Wednesday, November 4, 2026, November 04, 2026 WIB
Last Updated 2026-11-04T15:28:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

Advertisement

मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार, सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासण्यांसाठी दाखल करण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. शरद पवार यांना सकाळीच पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तपासण्यांसाठी शरद पवार यांना दाखल केलं असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्ही बाबांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत, असं स्टेटसच्या माध्यमातून कळवलं आहे. शरद पवार यांना आज सकाळीच पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा पुढील तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवार यांना अखेर आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं.  वातावरण बदलल्यामुळे शरद पवार यांना छातीत कफ झाला होता,यानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. शरद पवार हे दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यावरती होते, त्यादरम्यान त्यांना हवामान बदलामुळे कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांचा दुष्काळ पाहणी दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर शरद पवार यांना व्हील चेअरवरुन बाहेर आणण्यात आलं. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना हात उचांवून पवार यांनी इशारा केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते.