#

Advertisement

Admin Team
Tuesday, March 1, 2022, March 01, 2022 WIB
Last Updated 2022-03-05T19:29:17Z
आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाविकास आघाडी सरकारला अपयश : आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची टिका

Advertisement


राहाता - मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्या मंत्र्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. छत्रपती खासदार संभाजी महाराजांच्या उपोषण आंदोलनाला आपला पाठिंबाच असून, उद्याच मुंबईमध्ये त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार विखे म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नात मराठा समाजासह ओबीसी धनगर समाजाची मोठी फसवणूक महाविकास आघाडी सरकारने केली. या सरकारमुळे मराठा, धरनगर आणि ओबीसी समाजाची उपेक्षाच झाली आहे. या सरकारवर कोणत्याही समाज घटकांचा आता विश्‍वास राहीलेला नाही. सरकारने केलेली फसवणूक आणि आरक्षणाच्या संदर्भात असलेल्या निष्क्रियतेबद्दल सर्वच समाजांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर 17 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होवू शकली नाही. एकप्रकारे मराठा समाजाची फसवणूकच म्हणावी लागेल. याचा निषेध म्हणूनच छत्रपती खा.संभाजीराजे यांना आझाद मैदानवार उपोषणाला बसण्याची वेळ आली. महाविकास आघाडी सरकारकडे कोणत्याही समाजाच्या आरक्षणासाठी धोरण नसल्याची टीका केली.