#

Advertisement

Thursday, March 24, 2022, March 24, 2022 WIB
Last Updated 2022-03-24T10:51:18Z

सवलती बंद करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

Advertisement

 

नवी दिल्ली : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरांत आरामदायी प्रवास करता येतो. आतापर्यंत भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं  विविध प्रकारच्या प्रवाशांना अनेक सवलती दिल्या जात होत्या. आता या सवलती बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. रेल्वे मंत्राल
याच्या म्हणण्यानुसार, कोरोनापूर्वी रेल्वेकडून 53 श्रेणींमध्ये तिकिटांवर सूट दिली जात होती. मात्र, आता दिव्यांगांच्या केव चार श्रेणी आणि रुग्ण व विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींमध्येचं सवलत दिली जाणार आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.