#

Advertisement

Admin Team
Wednesday, March 23, 2022, March 23, 2022 WIB
Last Updated 2022-03-23T17:48:55Z
ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

"म्हाडा'वर नागरिकांचा विश्‍वास आहे" उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्‍तव्य

Advertisement







पुणे - "सर्वसामान्य नागरिकांचा "म्हाडा'वर विश्‍वास आहे. त्यामुळे "म्हाडा'च्या घरासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. सर्वसामान्य नागरिकांचा हा विश्‍वास "म्हाडा'ने जपावा,' असे वक्‍तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 2,703 नवीन सदनिका व 58 व्यापारी संकुलासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी खासदार ऍड. वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. म्हाडाच्या घरामुळे गरजूंच्या घराची स्वप्नपूर्ती होते. सर्व सुविधांयुक्त घर देण्यासाठी म्हाडाने पुणे शहराच्या विकासासाठी आणखी योगदान द्यावे, असे ही पवार यांनी सांगितले.