Advertisement
मुंबई : यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच लागणार आहेत असं सांगण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. तर या आठवड्यातच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा उद्या म्हणजेच 15 जून 2022 ला जाहीर होणार असा सांगण्यात आलं होतं. मात्र यासंबंधीची कुठलीही अधिकृत घोषणा स्टेट बोर्डाकडून किंवा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे.