#

Advertisement

Wednesday, June 15, 2022, June 15, 2022 WIB
Last Updated 2022-06-15T12:33:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदाराने नाकारले भोजन ; पीआरसी कमिटीच्या पावित्र्याने ‘झेडपी’ प्रशासनाची दाणादाण

Advertisement

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी पंचायतराज समिती बुधवारी सोलापुरात दाखल झाली आहे. पंचायतराज समितीचे अध्यक्ष रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. सकाळच्या सत्रात स्वागत, परिचय, यानंतर आढाव्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी भोजनाची सुट्टी घेण्यात आली. र, जिल्हा परिषद प्रशासनाने अडचणीच्या ठिकाणी केलेली भोजन व्यवस्था पीआरसी कमिटीच्या सदस्याने नाकारल्यामुळे अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व सदस्यांची ऑफिसर्स क्लब येथे भोजनाची व्यवस्था केली आहे. बैठकीनंतर सदस्य भोजनस्थळी पोहोचले. पण तेथील व्यवस्था पाहून एका आमदाराने भोजन नाकारले. ‘मी माझ्या स्वतःच्या खर्चाने इतर ठिकाणी भोजन घेईन’, असे म्हणून ते तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले.