#

Advertisement

Friday, June 17, 2022, June 17, 2022 WIB
Last Updated 2022-06-17T10:19:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के

Advertisement

मुंबई : राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. यात कोकण विभाग अव्वल आला असून, नाशिक विभाग सर्वात मागे राहिला आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे. अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.  या वर्षी परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,84,790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,68,977 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94 आहे. 

दहावीचा विभागवार निकाल

१) पुणे 96.96   २) नागपूर 97.00  ३) औरंगाबाद 96.33  ४) मुंबई 96.94

५) कोल्हापूर 98.50  ६) अमरावती 96.81  ७) नाशिक 95.90  ९) लातूर 97.27

१०) कोकण 99.27