#

Advertisement

Thursday, June 16, 2022, June 16, 2022 WIB
Last Updated 2022-06-16T13:10:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशहर

उद्या दहावीचा निकाल

Advertisement



दहावीच्या निकालाची (SSC Result 2022) प्रतीक्षा पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उद्या १७ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. MSBSHSE च्या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. 
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 

असा पहा १० वीचा निकाल

  • SSC Examination March – 2022 RESULT लिंकवर क्लिक करा.
  • आता Roll Number आणि Mother’s First Name भरा.
  • त्यानंतर View Result वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, याची प्रत (Print Out) घ्यायला विसरू नका.

येथे पहा निकाल :

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in