Advertisement
माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत, याचे कारण सांगत अप्रत्यक्षपणे उदयनराजेंवर आरोप केले होते. सातारा एमआयडीसीचा विकास खंडणी, टक्केवारी नेत्यांमुळे रखडला आहे. टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाका, असे सांगत अजित पवारांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे त्यांच्याकडे आलेला व्हीडिओ देत चौकशी करण्याची सूचना केली होती. यावर उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात प्रतिक्रिया दिली.