Advertisement
सोलापूर : पीआरसी कमिटी चेअरमन संजय रायमुलकर यांच्यासह आमदारांचा ताफा मंत्रालयीन अधिकारी सोलापूरात सायंकाळी दाखल झाले आहेत. उदया सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा परिषद कारभाराची तपासणी आणि साक्ष घेण्यात येणार आहे. सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रश्नाचे उत्तरे देण्याची तयारी दर्शवली आहे.
विभाग प्रमूखांसह माजी सीईओ ,विभाग प्रमूखांची उपस्थिती असणार आहे. पीआरसी कमिटी दरम्यान दलितवस्ती सुधार योजनेच्या टक्केवारीचा विषय ऐरणीवर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माळशिरस आमदार राम सातपुते समाजकल्याण विभागातील भ्रष्ट कारभाराची वाचा जिल्हा नियोजन सभेत फोडली होती. टक्केवारी घेणाऱ्या चंचल पाटील आणि लिपीक यांना निलंबीत करा आशी मागणी करित हे जर खोट असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन असा इशारा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
