Team Lakshvedhi
Last Updated
2022-06-16T11:53:22Z
विमान प्रवास महागणार
Advertisement
दिल्ली : विमानाने प्रवास महागणार आहे. कारण, एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती १६.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हवाई इंधनाच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये हवाई इंधनाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. दिल्लीत एटीएफचा दर १.४१ लाख रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. याआधी १६ जून रोजी त्यात १६.३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत हवाई इंधनाच्या किमती ९१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हवाई इंधनाच्या किमती २०२२ मध्येच सलग १० वेळा वाढवण्यात आल्या आहेत. यानंतर १ जून रोजी त्याच्या किमतीत १.३ टक्क्यांनी किरकोळ कपात करण्यात आली. त्यानंतर जागतिक बाजारातही कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. मात्र आता त्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आता येत्या काही दिवसांत विमान प्रवासाचे भाडेही वाढू शकते. एअरक्राफ्ट ऑपरेशनमध्ये एटीएफवरील खर्चाचा वाटा ४० टक्के राहिला आहे. त्यामुळेच हवाई इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम प्रवाशांवर होतो.