Advertisement
ठाणे : आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेली वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, केतकी चितळेला महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना महिला आयोगानं समन्स पाठवला असून, १७ जूनला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. केतकीला १५ मे रोजी शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पुढील सुनावणी २१ जून रोजी होणार आहे. तसेच महिला आयोगानं समन्स पाठवला असून, १७ जूनला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.