Advertisement
सोलापूर : शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नाही, असे जाहीर
केले. पण, संजय राऊत राष्ट्रपतिपदासाठी त्यांचेच नाव पुढे करुन वेगळीच मागणी करत
आहेत. राऊत यांचे बोलणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचाच प्रकार आहे, अशी टीका रयत
क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली. नशिब, संजय राऊत हे शरद
पवार यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करावे, असे म्हणाले नाहीत. त्याबद्दल संजय
राऊत यांचे अभिनंदन करतो, असा टोला खोत यांनी लगावत खिल्ली उडवली.
सदाभाऊ खोत
सोलापूर दौऱ्यावार असून, झेडपी पीआरसी साक्ष बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद
साधला. खोत म्हणाले, ईडी सध्या ज्या माणसांची चौकशी करत आहेत. ती माणसे भाग्यवान
आहेत. कारण लक्ष्मी त्यांच्याकडे सोनपावलांनी अवतरली आहे. राज्यात ज्यांच्याकडे
लक्ष्मी अशी अवतरली, त्यांच्याकडेही ईडीने जावे. त्यामुळे आणखी कोण-कोण असे
भाग्यवान आहेत, हे राज्याला कळेल, असे सदाभाऊ खोत म्हणाले. शासनाची पंचायत राज
समिती बुधवारपासून 3 दिवसांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यामध्ये
सदाभाऊ खोत यांचाही सहभाग आहे, त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी
बोलताना खोत बोलत होते.