Advertisement
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 20 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. याबाबतची निश्चित माहिती समोर आली आहे. येत्या 22 जुलैला म्हणजेच शुक्रवारी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या दिवशी 12 मंत्री आपल्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. यापैकी पहिला टप्पा हा 22 जुलैला पार पडेल. दरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या तर हा विस्तार 23 जुलैला होणार, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 5/7 या आधारावर ही शपथविधी पार पडणार आहे. शिंदे गटाचे 5 मंत्री आणि भाजपचे 7 मंत्री असे एकूण 12 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे भाजपच्या दिल्ली हाय कमांडची मंत्रिमंडळ विस्तारावर बारीक नजर आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत याआधी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत. शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहे. शिंदे गटामध्ये 40 बंडखोर आमदार आणि 10 अपक्ष आहे, त्यामुळेच शिंदे गटाला जास्त मंत्रिपदं हवी आहेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे. त्यामुळेच भाजपकडून याला होकार दिलेला नाही.
