Advertisement
- कोमल अजय साळुंखे-ढोबळे, महिलाध्यक्षा, बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज शुक्रवारी (दि.22) वाढदिवस आहे. नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि पक्षहितासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याविषयी काही तरी लिहावे, असे मनापासून वाटले. माझे वडील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यामुळे घरात राजकीय वातावरण अनुभवत आले असले तरी आज वडिलांकडून ज्यावेळी देवेंद्रजी यांचे कौतूक ऐकते त्यावेळी आजच्या "प्रोफशनल' राजकारणातही असे निष्ठावंत नेतृत्व असल्याने समाधान वाटते. वडील आज भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत. त्यांच्या सोबतीने त्यांनीच स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषेदची जबाबदारी सांभाळताना राजकारणाचे विविध पैलू, मुद्दे पहायला मिळतात. यातून देवेंद्रजी यांच्याबद्दल एक राजकीय नेतृत्व म्हणून जो काही आदर निर्माण झाला आहे, तो त्यांचे कतृत्व आणि दातृत्व पाहून. पक्षाप्रति मोठी निष्ठा बळणारे हे नेतृत्त्व खरोखरच आमच्या सारख्या नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिशा देणार वाटते.महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्याकडे केवळ राजकीय नेता म्हणून नव्हे तर राजकारणातले आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणून वडिलांकडे पाहत आले आहे. त्यानंतरच्या बदल्या काळात सर्वात पहिला पक्ष त्यानंतर आपला मतदारसंघ तसेच नागरिक आणि त्यानंतर आपण... या सुत्रानुसार ज्यांनी राज्यात पक्षबांधणी भक्कम केली. तसेच, सत्ता नसतानाच्या काळात कार्यकर्त्यांना त्यांनी जपले आणि कार्यकर्त्यास मोठे केले, हे अभ्यासपूर्णच आहे. देवेंद्रजींनी आपली काम करण्याची पद्धत, निर्णयक्षमता, धडाडी, चिकाटी, संयमीपणा, पारदर्शकता, कार्यतत्परता, संवेदनशीलता अन् चाणाक्षपणातून दोन दशकाहून अधिक काळ राज्यात भाजप आणि स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले आहे. आज त्यांनी राजकारणातील सर्वोच्च भूमिका निभावली आहे. नेहमीच सत्याची बाजू धरून त्यानुसार वाटचाल करणारे देवेंद्रजी फडणवीस हे व्यक्तिमत्त्व नवयुवकांसाठी प्रेरणादायी आहे.
ज्यावेळी राज्यात सत्तांतर झाले, त्यावेळी देशातील मोठा पक्ष असलेल्या भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री होणार, असा पक्का विश्वास सर्वांनाच होता. परंतु, पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर त्याग आणि समर्पित वृत्ती असलेले देवेंद्रजी फडणवीस आपण सर्वांनीच पाहिले. स्वतःच्या वाट्याचे मुख्यमंत्रीपद मित्रपक्षाच्या गटाला देत त्यांनी उपमुख्यमंत्री स्विकारले. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाने दिलेला आदेश मला शिरसावंद्य आहे, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन करीत असल्याची देवेंद्रजी यांची वक्तव्यच त्यांच्यातील त्यागाची भावना सांगून जातात. देवेंद्रजींची पक्षाबद्दलची निष्ठा आणि त्याग यातून आपल्या सर्वांनाच स्पष्ट जाणवला. त्यामुळेच ते एक खरे नेतृत्त्व असल्याचे मानले जाते, असे मला मनोमन वाटते.
