Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील घरावर जप्तीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा खूप मोठा झटका आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. ईडीला ज्या पद्धतीने त्यांच्या संपत्तीच्या, मालमत्तीच्या व्यवहाराच्या नोदींविषयी अनियमितता आढळली होती. याचमुळे प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीजी हाऊसमधील घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
