Advertisement
मुंबई : आदित्य साहेबांच्या हातात शिवबंधन नाही ते शिवसैनिक आहेत का? तुमच्या मताच्या भिकेवर मी सावकार झालो पण सरकार पाडण्यात पहिल्या 4 मध्ये मीच होतो. जे करते है छाती ठोक करतो आहे. यामुळे मला कोणाची भिती नाही, आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्य दौरा करत आहेत. यावर निशाणा साधताना आमदार सुहास कांदे म्हणाले कि, ही सत्ता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांनी दिली मोदींना बघून बाळासाहेबांना बघून राज्य आपल्या हातात दिले होते. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते शरद पवारांनी ऐनवेळी खोडा घातला. शरद पवारांना माहित होत उधव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तर सेना फुटेल आणि ते तेंव्हा नाही आता झालं. सगळे निघून गेले भक्ते बडवे तुमच्या सोबत राहिले आहे ज्यांचे पोट तुमच्यावर आहे. मी आजही शिवसेननेत उद्याही शिवसेनेत धनुष्य देखील आमचाच आहे. या पुढच्या सगळ्या निवडणुका धनुष्य चिन्हावर आम्ही लढू आणि कायद्याने मूळ शिवसेना आमचीच आहे कायद्याने जे जे हंव ते सगळ आमच्याकडे आहे.
