Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्यांनी पेट्रोल 5 आणि डिजेल 3 रुपयांनी स्वस्त करीत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं. हा सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी 8 निर्णय घेतले, याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या योजनेबद्दल बोलत असताना शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिशाला लावलेला पेन काढला आणि काहीतरी एका चिठ्ठीवर लिहिलं आणि हळूच ही चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्यासमोर केली.
यानंतर मुख्यमंत्री काही सेकंदासाठी थांबले, आणि ती चिठ्ठी वाचली आणि पुन्हा बोलू लागले. त्या चिठ्ठी नेमकं काय लिहिलं होतं, याबाबत आता चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन बोलतात का, असाही सवाल केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी ती चिठ्ठी वाचून त्यानुसार आपल्या बोलण्यात बदल केला, की, त्याकडे दुर्लक्ष याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.