Advertisement
पुणे : "आम्ही सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी आम्ही परस्परांचा मान ठेवला आहे. पण आता इथे उपमुख्यमंत्रीच मुख्यमंत्र्यांचा माईक खेचत आहेत. नावं घेण्यावरुन मानपान सुरुय", अशी टीका अजित पवार यांनी केली.
"नावं घेताना एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या धैर्यशील माने यांचं नाव घेतलं. आबिटकर, राजेश क्षीरसागर यांचं नाव घेतलं. पण धनंजय महाडिक यांचं नाव घेतलं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चिठ्ठीवर नाव लिहून दिलं. पण अशा गोष्टी करु नयेत. कारण मीडियाच्या कॅमेऱ्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ही तर सुरुवात आहे. सुरुवातीलाच अशी ओढाओढ, चिठ्ठा देणं सुरु झालं तर पुढे काय होणार हे महाराष्ट्राने पाहावं", असा टोला अजित पवारांनी लगावला.