Advertisement
मंगळवेढा : श्री संत दामाजी साखर कारखाना मतमोजणीसाठी 200 कर्मचारी नेमले असून, 27 टेबलद्वारे मतमाेजणी केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी गुरुवारी (दि.14) शासकीय गोडाऊन येथे होणार आहे. यासाठी सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार आहे.
दामाजी कारखान्याच्या 20 संचालक निवडीसाठी 12 जुलै रोजी मतदान झाले हाेते. यासाठी 14 जुलै रोजी मतमोजणी हाेत आहे. 27 टेबल ठेवले आहेत. या प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी नेमले असून, 24 हजार 521 मतांची मोजणी होणार आहे. मोजणी चार फेऱ्यांमध्ये होणार आहे. सत्ताधाऱ्यांना विराेध करण्यासाठी सर्वजण ऐकत्र येऊन समविचारी पॅनेल तयार केल्याने अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे.
बुधवारी दिवसभर काेणता गट विजयी हाेणार मतांची गाेळा बेरीज निकालाचा अंदाज काढत असल्याचे शहरात व ग्रामीण भागात चाैकाचाैकात चित्र हाेते. मतपेट्या ठेवल्या ठिकाणी गडबड हाेऊ नये यासाठी रात्रदिवस खडा पाेलीस बंदाेबस्त नेमण्यात आला आहे.