#

Advertisement

Friday, July 15, 2022, July 15, 2022 WIB
Last Updated 2022-07-15T11:18:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

दामाजी कारखान्यावर समविचारी गटाची निर्विवाद सत्ता

Advertisement


सत्ताधारी गटाला केवळ दोनच जागा
साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदारांचा पराभव
सोलापुर जिल्ह्यात चर्चेला उधाण

 
मंगळवेढा : तालुक्‍यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाले असून समविचारी गटाचे 19 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांचा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. सत्ताधारी गटाला केवळ दोन जागेवर "समाधान' मानावे लागले. चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 24 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. चार फेऱ्यात झालेल्या मतमोजणी मध्ये प्रत्येक फेरीत सम विचाराचे उमेदवार आघाडीवर राहिले.
समविचारी गटातून तानाजी खरात , शिवानंद पाटील , भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , शहराध्यक्ष गोपाळ भगरे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गौडापा बिराजदार, तालुका सरचिटणीस दिगंबर भाकरे हे तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील , भारत बेदरे , माजी सभापती निर्मला काकडे , लता कोळेकर , तर चरणुकाकाचे वारसदार राजेद्र पाटील , महादेव लुगडे, माजी संचालक बसवराज पाटील , भिवा दौलतडे , मुरलीधर दत्तू , दयानंद सोनगे , रेवणसिद्ध लिगाडे, तानाजी कांबळे, हे विजयी झाले.
मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने , सपोनि बापूसाहेब पिंगळे , अमोल बामणे , उपनिरीक्षक सौरभ शेटे , सत्यजित आवटे , यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.


श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक अंतिम निकाल
मंगळवेढा ऊस उत्पादक गट :
मुरलीधर सखाराम दत्तू 12671 , गौरीशंकर बुरकुल 12515 ,गोपाळ भगरे 12376,(विजयी), आ. समाधान आवताडे 10814 ,नीला आटकळे 10330, राजेंद्र सुरवसे 9445 बाद मते 1154.

ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गट :
दयानंद सोनगे 12287,राजेंद्र चरणू पाटील 12988,भारत बेदरे 12559, (विजयी),राजेंद्र सर्जेराव पाटील 10438, अशोक भिंगे 10130,सचिन चौगुले 10519 ,बाद मते 951 ,

मरवडे ऊस उत्पादक गट :
शिवानंद पाटील 13215,रेवणसिद्ध लिगाडे 12454 ,औदुंबर वाडदेकर 12465,(विजयी),प्रदीप खांडेकर 10871 , गणेश पाटील 10426, बसवेश्वर पाटील 10162, बाद मते 858.

भोसे ऊस उत्पादक गट :
भीवा डोलतोडे 12929 ,बसवराज पाटील 12842 , गौडाप्पा बिराजदार 12453,(विजयी),उमाशंकर कनशेट्टी 10544 , अंबादास कुलकर्णी 10484,आबा बंडगर 10130 बाद 831

आंधळगाव ऊस उत्पादक गट :
प्रकाश भिवाजी पाटील 13025, दिगंबर भाकरे 12726, महादेव लुगडे 12342, (विजयी)
सुरेश भाकरे 10629,विनायक यादव 10259,बाळासो शिंदे 9941,बाद मते 878.

महिला राखीव :
निर्मला काकडे 13107, लता कोळेकर 12787 (विजयी), कविता निकम 10354, स्मिता म्हमाने 10059 ,बाद मते 981,

मागासवर्गीय मतदार संघ :
तानाजी कांबळे 12961 (विजयी)
,युवराज शिंदे 10726 बाद मते 731

भटक्‍या विमुक्त जाती मतदार संघ :
तानाजी खरात 13506 (विजयी), विजय माने 10404 ,बाद मते

संस्था व पनन मतदार संघ :
सिद्धेश्वर आवताडे 149 जगन्नाथ रेवे 4

इतर मागासवर्गीय प्रवर्ग :
अशोक केदार बिनविरोध

रोष मतपेटीतून व्यक्त झाला
संस्था वाचवण्याच्या दृष्टीने दामाजीची निवडणूक सभासदांनी हातात घेतली ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप न करणे , कामगारांच्या पगारी न देणे या सर्वच बाजूनी सत्ताधाऱ्यावर रोष होता तो रोष त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला.
- शिवानंद पाटील , समविचारी आघाडी प्रमुख