Advertisement
पिंपरी चिंचवड : उद्योगनगरीत एका कपंनीत काही अज्ञात पुष्पाने शेकडो झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पिंपरीतील मे.फॉरमायका याकंपनीत हा प्रकार घडला, धक्कादायक बाब म्हणजे तोडलेल्या वृक्षाचे पुरावे नष्ट करण्यासाठी या जागेचं JCB द्वारे सपाटीककरणं करण्यात आले आहे. मात्र आत सॅटॅलाइट इमेजवरून हे दृष्य पाहिल्यास मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याच समजून येते. पिंपरीतील "अपना -वतन " या सामाजिक संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाली आहे. यानंतर महापालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांनी आता संबंधित कंपनी प्रशासनाला अवैध वृक्ष तोड केल्याप्रकरणी तब्बल 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.