Advertisement
कोल्हापूर : महाराष्ट्रात काल (दि.13) पावनखिंड रणसंग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी हजारो शिवप्रेमी विशाळगड आणि पावनखिंडला भेट देण्यासाठी गेले होते. दरम्यान पावनखिंडला गेलेल्या काही पर्यटकांमधील तरुणांनी मद्यपान करून आल्याने त्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे मद्यपी मद्यपान करून पावनखिंड ठिकाणी धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना शिवभक्तांनी पकडून जाब विचारत चांगलाच चोप दिला.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहूवाडी या दोन तालुक्यामध्ये असणाऱ्या पावनखिंडमध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा आहेत. सिद्दीच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी पावनखिंडीतून शिवराय विशाळगडावर पोहोचले होते यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांच्यासारख्या अनेक मावळ्यांनी बलिदान दिल्याने पावनखिंडीत प्रत्येक वर्षी रणसंग्राम दिवस साजरा केला जातो. दरम्यान काही मद्यपी मद्यपान करून पवित्र स्थानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याने मद्यपींना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिला.