Advertisement
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे निकटवर्तीय खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहेत. राऊत यांना ईडीच्या समन्सची ही पहिली वेळ नाही. त्यांना याआधीदेखील ईडीने समन्स बजावले आहेत. त्यांची ईडीकडून चौकशीदेखील झाली आहे. यावेळी ईडीने त्यांना उद्याच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना समन्स बजावले आहेत. याआधी संजय राऊतांची तब्बल 10 तास चौकशी झाली होती. या प्रकरणी ईडीकडून सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची चौकशी झाली. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या मालकीची 11 कोटींची मालमत्ता देखील जप्त केली आहे. त्यामध्ये प्रवीण राऊत यांची पालघर जिल्ह्यातील मालमत्ता होती. तर संजय राऊत यांचा दादरमधला एक फ्लॅट, तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर असलेले अलिबागमधील 8 प्लॉट, सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटक यांच्या नावे असलेल 4 प्लॉट अशी सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
