#

Advertisement

Tuesday, July 19, 2022, July 19, 2022 WIB
Last Updated 2022-07-19T11:49:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर महापालिकेसह नगरपालिकांचा निधी रोखला

Advertisement

कोल्हापूर : भाजप आणि एकनाथ शिंदे गटने सरकार स्थापनेनंतर महाविकास आघाडीला  शिंदे यांनी अनेक धक्के दिले आहेत. शिंदेंनी अनेक ठिकाणी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले आहेत. आता शिंदेंनी कोल्हापूर महापालिकेसह  कागल आणि मलकापूर नगरपालिकांना देण्यात आलेला निधीही रोखला आहे. कोल्हापूर महापालिकेसह कागल आणि मलकापूर नगरपालिकांना देण्यात आलेला 15 कोटी 29 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने रोखला आहे. निधी रोखण्याचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले आहेत. ठाकरे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केलेल्या निधीचा आढावा घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिकांचा निधी रोखला जात आहे. या आदेशापूर्वी ‘वर्क ऑर्डर’ झालेली असेल, तर मात्र हा निधी खर्च करता येणार आहे. 
कोल्हापूर महापालिकेला मुलभूत सुविधांसाठी प्रत्येक पाच कोटी याप्रमाणे दोनवेळा एकूण दहा कोटीचा निधी दिला गेला. कागर नगरपालिकेला 3 कोटी 70 इतका निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी देण्यात आलेला. यासोबतच विशेष बाब म्हणून 1 कोटी 30 लाख निधी देण्यात आलेला. यासोबतच मलकापूर नगरपालिकेलाही २९ लाखांचा निधी दिला गेला. हा निधी थांबवण्याचे आदेश आता शिंदे सरकारने दिले आहे.