Advertisement
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील अकोले येथे विराेधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाहनाचा शेतकऱ्यांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी ताफा अडवला. यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना अटक केल्याचा निषेध आंदाेलकांनी विराेधी पक्ष नेत्यांकडे नाेंदविला. दशरथ सावंत यांना पोलीसांनी अजित पवारांची भेट नाकारली. सकाळीच दशरथ सावंत यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी ताफा अडवला होता.
दरम्यान यानंतर तातडीने पोलिसांना आंदोलकांना हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 2019 साली राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या मधुकर पिचड आणि सिताराम गायकर यांच्या विरोधात अजित पवार यांनी सभा घेत सिताराम गायकर यांचे धोतर फेडणार अशी वल्गना केली होती. मात्र आता अकोले सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचडांपासून बाजूला होत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सिताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते.
