Advertisement
पुणे : मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पूजाअर्चा केल्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. पूजाअर्चा ही निषेधार्ह गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही. धर्मनिरपेक्षता आपण जोपासली पाहिजे आणि आपल्या धर्माचे स्तोम आपण जगजाहीर करण्याची गरज नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात झालेल्या या कृतीचा मी तीव्र आणि कडवट शब्दात निषेध करतो, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.
आपल्या मंत्रालयातील दालनात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजा केली. या कृतीचा संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दात निषेध केला आहे. राज्य सरकारहे धर्मनिरपेक्ष आहे. असे असताना ही पूजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय राज्यघटनेचा तर अवमान केलेलाच आहे, पण राज्य सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाचाही अवमान केला आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
