Advertisement
मुंबई : मुंबईत अतिवृष्टीमुळे प्रचंड बिकट परिस्थिती निर्माण होते. रस्ते पाण्याखाली जातात, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने उद्या गुरुवार 14 जुलैच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. उद्या मुख्यतः इंजिनिअरिंग विद्या शाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्या शाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी दिली आहे.
