Advertisement
मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्या गळ्यात मुंबई अध्यक्षपदाची माळ पडू शकते. भाई जगताप हे सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुख्य म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांच्यातच शेवटच्या फेरीचा सामना रंगला, या सामन्यात चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला.
चंद्रकांत हांडोरे यांच्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांना रिपोर्ट द्यायला सांगितला. या रिपोर्टनंतर सोनिया गांधींनी निर्देश दिले आहेत. दरम्यान पक्षाने जबाबदारी दिली तर स्वीकारेन, असं हांडोरे म्हणाले आहेत. तसंच विधान परिषद निवडणुकीतल्या पराभवाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत हांडोरे यांनी केली.
