#

Advertisement

Tuesday, July 26, 2022, July 26, 2022 WIB
Last Updated 2022-07-26T11:33:11Z

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद : शरद पवारांच्या जागी भाजप खासदाराची वर्णी

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आलं होतं.. भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला होती. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार होते. यानंतर आता याजागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. याजागी आता भाजपच्या रामदास तडस यांची वर्णी लागणार आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी धवलसिंह मोहिते पाटील आणि काका पवार यांनी अध्यक्ष पदाचासाठीचा अर्ज घेतला मागे आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला रामदास तडस यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळणार आहे. 
मागची 32 वर्ष महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. या वेळेस देखील ही परंपरा कायम राहिली. शरद पवार यांच्या गटाचे आपल्याला समर्थन असल्याचे तडस यांनी सांगितले. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ बरखास्त केलं होतं त्यानंतर या निवडणुका लागल्या होत्या. 28 जुलैला रामदास तडस यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल. भाजप खासदार रामदास तडस हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे.