Advertisement
नवी दिल्ली : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा येत्या 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात फैसला होणार असल्याची चर्चा होती. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, असं मानलं जात होतं. पण ही सुनावणी आता लांबणीवर जाण्याती शक्यता आहे. राज्य सरकारबाबतच्या याचिकांवर 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या आठवड्यातील सुनावणींविषयी यादी येत असतात. या यादीनुसार 2 ऑगस्टला राज्य सरकारच्या फैसला संदर्भातील याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे घटनात्मक खंडपीठापुढे ही सुनावणी होणार अशी चर्चा होती. पण अजूनही घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्यात आलेलं नाहीय. यापूर्वी 20 जुलैला सुनावणी झाली होती.
