Advertisement
यवतमाळ, : विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते यवतमाळ शहराचा दौरा करणार आहेत. यवतमाळच्या आगमनापूर्वी विश्राम भवन परिसरात पोस्टरबाजीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. 'आमचं ठरलंय' अशा आशयाच्या पोस्टर लावत पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र नेमके हे फलक कोणी लावले आणि कशासाठी कारण अद्याप समोर आलेलं नाही.
या फलकावर कोणत्याही पक्षाचं चिन्ह वा नेत्याचं नाव दिलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये या फलकाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीतून ही फलकबाजी केली असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातून ही फलकबाजी करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
