Advertisement
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जिवाला धोका आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण त्यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांना पत्राद्वारे एका अज्ञात हितचिंतकाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आहे. काही संदिग्ध लोक राजस्थान सीमेवरून अमरावतीत आले आहेत. लोक तुमच्या घरी जाऊन आले आहेत. तुम्हाला काहीही होऊ नये यासाठी मी प्रार्थना करतो. या पत्रामुळे नवनीत राणा यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर हे आल्याने खळबळ उडाली आहे.

