Advertisement
मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरुन काहीतरी फिस्कटलं का? अशी चर्चा सध्या रंगलेली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या तीन दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्ताराला थोडा विलंब झाला आहे, पण आमच्यात कोणत्याही पातळीवर कोणताही वाद नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करू. मंत्रिमंडळ निवडीत कोणताही भेदभाव नसून संभाव्य मंत्रिमंडळ खूप चांगलं असेल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी राज्यातील सरकावर टीका करताना म्हटलं होतं की ''उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झालं तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल.'' राऊतांच्या या दाव्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, राऊतांना जे बोलायचं ते बोलू द्या, त्यांना स्वप्नात राहू द्या पण आम्ही राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ.
