Advertisement
नागपूर : राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रश्न उपस्थित केले. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणातून व्यक्त केली. ते ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे बोलत होते.
