Advertisement
जुन्नर : "सध्याची परिस्थिती पाहता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच येत्या 3 महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लगेचच आमदारकीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे", असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी जुन्नरमध्ये केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.
2024 नंतरचा काळ हा युवकांचा आहे. युवकांचे दिवस आले कि निर्णय सुद्धा आपण घेणार. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्तेच्या राजकारणाची गणितं जुन्या नाही तर तरुणांच्या हाती येणार असल्याचे संकेतच भर सभेत रोहित पवारांनी यावेळी दिले. यावेळी तरुणांच्या हातात सत्तेची गणितं आणि निर्णय हे असेलच यासाठी शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शन करतील हेही सांगायला रोहित पवार विसरले नाही.
