Advertisement
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात वसतिगृहात राहतात. ऐन पावसाळ्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव, गरम पाण्याचा अभाव, स्वच्छ्ता नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
विद्यार्थीनींच्या सर्व समस्या समोर उघडकीस आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगरातील विद्यापीठ भागाच्या वतीने आज दिनांक १९ जुलै कुलसचिव प्रफुल्ल पवार यांची भेट घेऊन खालील विषयांवर त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वसतिगृहातील Late Pass-Out Pass पूर्वी प्रमाणे सुरू करावे, सर्व वसतिगृहातील पिण्याचे पाणी व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ व कायमस्वरूपी सोडवावा, गरम पाण्याची व्यवस्था करावी, स्वच्छता आणि दुरुस्ती-देखभाल तत्काळ करून घ्यावी, वसतिगृह प्रथमोपचार केंद्रात सुविधा असाव्यात अशा विविध मागण्यांना घेऊन यावेळी अभाविप च्या वतीने विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना निवेदन देण्यात आले.
