#

Advertisement

Tuesday, July 19, 2022, July 19, 2022 WIB
Last Updated 2022-07-19T17:23:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

भोसरीतील कंपनीला भीषण आग : 10 लाख रुपयांचे नुकसान

Advertisement

भोसरी : भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या कंपनीमध्ये फॉम, फॉमला चिकटवण्यासाठी लागणारे रसायन व ऑइल होते. ऑइल 200 लिटरच्या ड्रममध्ये साठवून ठेवले होते. अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. महापालिकेच्या 10 अग्निशमन बंबांनी दोन तासात विझवली. ही आग टी ब्लॉकमधील चिंतामणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये सकाळी सव्वा दहाच्या सुमारास लागली होती. जेव्हा ही आग लागली तेव्हा सुरुवातीस कमी प्रमाणात होती. परंतु, अचानक या आगीने रौद्र रूप घेतले. ही आग मोठी होऊन काळ्या धुराचे लोट बाहेर येऊ लागले. 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे उप अधिकारी प्रताप चव्हाण म्हणाले, की सव्वा अकरा वाजता पाटोळे नावाच्या नागरिकाने आग लागल्याचे कळवले. पिंपरी कार्यालयाचे दोन बंब तर भोसरी, तळवडे, थेरगाव, प्राधिकरण कार्यालयांचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी पोहोचले होते. तसेच, चाकण एमआयडीसी व पीएमआरडीएचे प्रत्येकी एक बंब देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी एका तासात आग आटोक्यात आणली. दोन तासात आग विझवण्यात आली व कूलिंग ऑपेरेशनही पूर्ण करण्यात आले.