Advertisement
पुणे : किनखापी
वाड्यांचा मालक 100 एकराचा जमिनदार आजोबा, या नगरीचा खासदार होता. पुढे वारसा
हक्काने बा (वडील) खासदार जाला. सध्या, खातेफोड झाली. खासदारकी रेटून मिळाली. मुलगा
ही सध्या खासदार आहे. ऐकूणच गेल्या पाच पिढ्या वाड्यात खासदारकी आहे. कोणत्याही
कामाशिवाय नगराची खासदारकी आहे. म्हणूनच अवघ राज्य अर्ध्या जिल्ह्याचा मालक समजतात.
पिढ्यान् पिढ्या खासदारकी मागे आली, त्यामुळे पाटील, देशमुख, राजकारणाचा सातबारा
आपल्या मालकीचा समजतात.
साखर कारखान्याचा चेअरमन असो, मेडीकल कालेजचा संस्था
चालक असो. याच पद्धतीवर खासदारकीपण आपल्या मालकीची समजतात. परंतु, पिढ्यान् पिढ्या
ओ.बी.सी.दलित, आदिवासी, समाज वडीलोपार्जीत कर्तव्य समजून मतदान करीत आले. अन्नदाता
मालकांसाठी रांगा लाऊन आदिवासी माय बहिणीने मतदान केले. त्याच पिढीतल्या वनवासी
समाजाच्या द्रोपदी मुर्मू, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार झाल्या.
देशातल्या
प्रस्तापित शेवाळलेल्या धन-दांडग्यांचे डोळे उघडले. प्रस्तापितांना मोठा धक्का
बसला! मोठा चमत्कार झाला. मोहाच्या झाडाखालची लेक राष्ट्रपती झाली. सरायत वाड्यात
राहणारी धन-दांडगी बावरून गेली. चार जिल्ह्यापुरते मर्यादीत असलेले काही पक्ष
खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती निवडीला विरोध करीत आले, त्यातही फटकळ तोंडाच्या
सर्वपक्षी नेत्यांना डावलून बाळासाहेबांची परंपरा सांभाळत उद्ववजीने ही मोठ्या
मनाने पाठींबा दिला. अनेक वर्षे पुरोगामी नेता म्हणून ढोल वाजविणारांची थोडीशी अडचण
झाली. 5 लाख 26 हजारांच्या पाठींब्यावर राष्ट्राची माऊली द्रोपदीला भारतीयांचे
आशिर्वाद मिळवून मोदींजीच्या बलशाली भारताची राष्ट्रमाता होणार आहे.
- प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री, संस्थापक अध्यक्ष, बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्य |
