#

Advertisement

Tuesday, July 19, 2022, July 19, 2022 WIB
Last Updated 2022-07-19T11:11:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आषाढी वारीमध्ये देणगीत भरीव वाढ ; 5 कोटी 70 लाखांची देणगी अर्पण

Advertisement


पंढरपूर
 : आषाढी यात्रेचा सोहळा दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेदरम्यान सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. या दरम्यान भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास 5 कोटी 70 लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत आषाढी यात्रेत 1 कोटी 30 लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. 
काेराेनामुळे गेली दोन वर्ष आषाढी वारी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यामुळे यंदा पंढरपूरात भाविकांची मांदियाळी हाेती. यंदाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदा सात ते आठ लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले हाेते. 2019 मध्ये झालेल्या आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीला चार कोटी चाळीस लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत 1 कोटी 30 लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे.