Advertisement
मुंबई : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जशासतसे प्रत्त्युत्तर दिलं आहे. आव्हाड यांनी ट्विटर वर ट्विट करत केसरकरांवर खोचक टीका केलीय.
केसरकरांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. अहो केसरकर पवार साहेबांविरोधात किती बोलता? एकेकाळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवलं होतं. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन, जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका, अशी खोचक टीका आव्हाड यांनी केली आहे.
