Team Lakshvedhi
Last Updated
2022-07-30T18:20:23Z
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
Advertisement
मुंबई : महाराष्ट्राचा मंत्रिमडळ विस्तार महिन्याभरापासून झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातत्याने दिल्लीवारी होत आहे. शनिवारी वैजापूरची सभा संपल्यानंतर शिंदे तातडीने वैजापूरवरुन औरंगाबादला निघाले. त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी ते दिल्लीला रवाना झाले आहेत. रात्रीच दिल्लीतून ते परत औरंगाबादला येणार आहेत. त्यामुळे औरंगाबादचे कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साडेपाच वाजता वैजापूरला दाखल झाले होते. त्यानंतर वैजापूरच्या सभेला त्यांनी हजेरी लावली. जवळपास पाऊण तास त्यांनी भाषण केले. यावेळी अनपेक्षितपणे माजी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत माजी कृषी मंत्री दादा भुसे माजी मंत्री संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.