#

Advertisement

Tuesday, July 26, 2022, July 26, 2022 WIB
Last Updated 2022-07-26T11:18:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

प्लॅस्टिक लॅमिनेशन असलेल्या उत्पादनावर बंदी

Advertisement

मुंबई : प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॉस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. केंद्र शासनाने 1 जुलै 2022 पासून सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लॅस्टिकबंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे.