Advertisement
मुंबई : कला, कौशल्य निपुण
असलेल्या महाराष्ट्ररातील मान्यवरांना "अष्टगंध जीवन गौरव', "अष्टगंध सन्मानपट' आणि
"अष्टगंध' पुरस्कार अवघ्या महाराष्ट्रातील शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रा
"शब्दप्रभु' म्हणून ओळख आहे असे माजी शिक्षण आणि पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव
ढोबळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले, अशी माहिती अष्टगंधचे संपादक लक्ष्मण
कोकाटे यांनी सांगितले.
"अष्टगंध'चा 33वा वर्धापन दिन दादर पूर्व येथे मोठ्या
उत्साहात झाला. वर्धापन दिना निमित्त सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी
"अष्टगंध सन्मानपट'द्वारे आदिवासी बांधवांसाठी सदैव कार्यरत असलेले पंकज पाठक
यांचाही विशेष गौरव करण्यात आला तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या थोर महिला
सक्षमीकरण समाजसेवेत झोकून घेणाऱ्या महिला सौ. सीमा प्रदिप घोरपडे, अमोल दादा जाधव,
विशाल नागनाथ खंदारे, चंद्रशेखर जाधव यांना "अष्टगंध पुरस्कारा'द्वारे गौरविण्यात
आले.
अष्टगंध वर्धापन दिन निमित्त प्रमुख अतिथी म्हणून विशेष कार्यकारी
अधिकारी. मा.मंत्री नगर विकास व सार्वजनिक बांधकामचे नितीन दळवी, शाहू शिक्षण
संस्थेच्या संचालक कोमल अजय साळुंखे उपस्थित होत्या. सूत्र संचालक आदित्य बने,
समारंभ अध्यक्ष संतोष परब, संपादक लक्ष्मण कोकाटे, प्रकाशिका उर्मिला कोकाटे,
पडद्याआड राहून सदैव सहकार्य करणारे गोरेगाव विभाग प्रमुख वनवासी कल्याण आश्रमचे
आनंद कांबळे तसेच अष्टगंध परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

