#

Advertisement

Wednesday, July 27, 2022, July 27, 2022 WIB
Last Updated 2022-07-27T11:18:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बंडखोर आमदाराला बहिणीचंच आव्हान...

Advertisement

कोल्हापूर  : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. संख्याबळाचा विचार केला तर सध्या एकनाथ शिंदे यांचं पारडं जड आहे. अजूनही शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. अशात एक-दोन घटना अशा घडल्या आहेत, ज्यामुळे भविष्यात ठाकरे गटाला पुन्हा उभारी मिळू शकते. कालच कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. तर आज पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोर शिवसेना आमदाराला घरातूनच आव्हान मिळालं आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक कै. आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात फलक लावून आपण ठाकरे यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आर ओ तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार समजले जाणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना हे मोठे आव्हान ठरणारे आहे. वैशाली सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे आमदार किशोर पाटील कुटुंबीयांत राजकीय व वैचारिक फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही फुट पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात राजकीय भूकंप ठरू शकतो.