Advertisement
औरंगाबाद : मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील 15 ते 16 आमदार "मातोश्री"च्या संपर्कात असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
खैरे म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढली आहे. त्यांना असं वाटत आहे की, आपण उगीचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडलं. गेलेल्या सर्व 50 आमदारांना मंत्रिपद मिळणं शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्यामध्ये उद्रेकता वाढत आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा दावा खैरे यांनी केला.
