Advertisement
जालना : एखाद्या सिनेमाला लाजवले असा छापा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये टाकला. छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणाला लागू नये म्हणून आयकर विभागाचे अधिकारी चक्क वऱ्हाडी बनून आले होते. दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर असलेल्या लग्नाच्या गाड्यांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात पोहोचले आणि आठ दिवस छापे मारून 390 कोटी बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला.
स्टिल उत्पादनामध्ये जालना हा महाराष्ट्रात नावाजलेला आहे. पण, आयकर विभागाने स्टिल कारखानदारांचा बेकादेशीर उद्योग चव्हाट्यावर आणला आहे. आयकर विभागाने स्टिल उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या घर, फार्महाऊस आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छाप टाकला. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हातात मोठे घबाड लागले आहे. तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढंच नाहीतर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे.
मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होते. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये तब्बल 390 कोटींची रोकड हाती लागली. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 16 तास लागले.
