Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीच्या बड्या पाच नेत्यांची लवकरच ईडीकडून चौकशी होणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट माढ्याचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी केला आहे. लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा, खासदार निंबाळकर यांनी केला आहे.
खासदार निंबाळकर यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या दहा पैकी पाच नेत्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पाच बडे नेते कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
