Advertisement
सोलापूर : सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर चले जाओं असा नारा देत महानगर पालिका कर्मचारी संघटनेनी मोर्चा काढत जाहीर सभा घेतली. कामगार कृती समितीने गुरुवारी कामबंद आंदोलन करण्याची हाक दिली होती. कृती समितीचे कामगार नेते अशोक जानराव यांनी आयुक्त पी.शिवशंकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. आयुक्त शिवशंकर बेजाबदार वक्तव्यामूळे आणि सातत्याने देण्यात येणाऱ्या त्रासामूळे आत्ता पर्यंत चार महापालिका निरीक्षक मरण पावले आहेत. तर एका निरीक्षकाला हृदयविकाराचा झटका आला असून तो उपचार घेत असल्याचा गंभीर आरोप कामगार नेते जानराव यांनी केला आहे. पुढे बोलताना जानराव म्हणाले की, शासन निर्णय असलेल्या लाड कमिटीची अंमलबजावणी कर्मचाऱ्यांचे आतोनात नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी बुधवारी दिवसभर पालिकेच्या विविध विभाग, विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या. कामबंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मनपा अधिकारी आणि कर्मचारी आयुक्तांच्या दहशतीखाली काम करीत आहेत. कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा, कंत्राटी पद्धत करावी. कामाची हाक दिली आहे. यावेळी जनार्दन शिंदे, प्रदीप जोशी, चांगदेव सोनवणे, बाबासाहेब क्षीरसागर, अजय क्षीरसागर, शशिकांत शिरसाठ, संजय असोरे, सायमन गढ़, बाली मंडेपू, जयकुमार कांबळे आदी उपस्थित होते.
